www.24taas.com, मुंबई
गेल्या वर्षी सहकाऱ्याला बडतर्फ केल्याच्या निषेधार्थ मुंबईतील पश्चिम रेल्वेचे ६० मोटारमन अचानक संपावर गेले होते. त्यामुळे चर्चगेटहून एकही गाडी सुटू शकली नव्हती. त्यामुळे मुंबईकरांचे हाल झाले होते.
अडीच वर्षांपूर्वी घडलेल्या एका प्रकरणात मिल्कित सिंग हा मोटारमन दोषी आढळल्याने पश्चिम रेल्वेने त्याला कामावरून बडतर्फ केले होते.
याच्या निषेधार्थ एकूण ४५० पैकी ६० मोटरमनने अचानक संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. सुरूवातीला त्यांनी आजारी असल्याचं कारण देऊन कामावर गैरहजर राहण्याचे सांगितले होते. त्यानंतर सर्व ६० मोटरमनने संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता.
दुसऱ्या शिफ्टवरील या मोटरमनने संप पुकारल्यानंतर पहिल्या शिफ्टच्या मोटरमन्सला आपली शिफ्ट पुढे वाढवावी लागली होती.