गोरेगावात तरुणीवर अॅसिड फेकले

मुंबईतील गोरेगावमध्ये सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आरती ठाकूर या २२ वर्षीय तरुणीवर अॅसिड फेकण्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात आरती ही दहा टक्के भाजली आहे. ही घटना गोरेगाव रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १वर घडली.

Updated: Feb 1, 2012, 02:59 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबईतील गोरेगावमध्ये  सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास २२ वर्षीय तरुणीवर अॅसिड फेकण्याचा प्रकार घडल्याने खळबळ  उडाली आहे.  या हल्ल्यात ती दहा टक्के भाजली आहे. ही घटना  गोरेगाव रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १वर घडली.

 

आरती नावाची तरूणी प्लॅटफॉर्मवर उभी असताना तिथे आलेल्या अज्ञाताने तिच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकलं. अॅसिड फेकण्याची घटना एकतर्फी प्रेमातून घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.  आरती ही एका खासगी कंपनीत नोकरी करत आहे. ती नालासोपारा येथे जाण्यासाठी कुपन पंच करण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १वर होती. यावेळी एकाने अॅसिड फेकून तेथून पळ काढला. या घटनेत तिचा चेहरा आणि उजवा हात भाजला असून जखमी अवस्थेत तिला गोरेगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 

दरम्यान पोलिसांनी संबंधित संशयिताला अटक केली आहे. रेल्वे पोलीस आणि गोरेगाव पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.  असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

[jwplayer mediaid="39183"]