प्रगतीपुस्तक अजय बोरस्तेंचं

आगामी महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १४ मधून विद्यमान नगरसेवक अजय बोरस्ते इच्छुक आहेत. मागील दोन टर्मपासून या वॉर्डमधून ते निवडून आलेत. त्यांची कार्यकुशलता बघून त्यांना उपमहापौरपदही देण्यात आलं.

Updated: Dec 27, 2011, 09:48 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

आगामी महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १४ मधून विद्यमान नगरसेवक अजय बोरस्ते इच्छुक आहेत. मागील दोन टर्मपासून या वॉर्डमधून ते निवडून आलेत. त्यांची कार्यकुशलता बघून त्यांना उपमहापौरपदही देण्यात आलं. मात्र त्यानंतर त्यांनी पक्षाला ‘जय श्रीराम’ करत शिवसेनेत प्रवेश केला आणि महानगरप्रमुखपद भूषवलं.

 

मात्र नुकतंच त्यांना या पदावरून पायउतार व्हावं लागलंय. मागील पाच वर्षात अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य केल्याचा दावा बोरस्तेंनी केलाय. यात प्रामुख्यानं दहा लक्ष लिटर क्षमतेची पाण्याची टाकी, नवीन पाईपलाईन, सोलर सिस्टीमवरील सिग्नल यंत्रणेचा समावेश आहे.

 

बोरस्तेंच्या कामावर नाराजीही व्यक्त होतेय. के.टी.एच.एम. कॉलेजसमोरील उड्डाण पूलाची बांधणी योग्य पद्धतीनं झाली नसल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय. बोरस्तेंनी त्यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून विकासकामांऐवजी इव्हेंट मॅनेजमेंटचीच काम केल्याचा आरोप करण्यात येतोय.

 

बोरस्तेंच्या वॉर्डात मोठ्या प्रमाणात विकास कामं झालेली असल्यामुळं सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून चर्चेत राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मात्र नव्यानं निर्माण झालेली प्रभाग पद्धती, केलेलं पक्षांतर यावर मात करत त्यांना निवडणुकीत यश मिळवावं लागणार आहे.