भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

भाजपनं मुंबई महापालिकेसाठी ३२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. यात माजी उपमहापौर विद्या ठाकूर यांच्यासह चार नगरसेवकांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. भाजपमधलं गटातटाच्या राजकारणाचा समन्वय साधण्याचा प्रयत्न यात करण्यात आला.

Updated: Jan 24, 2012, 06:03 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

भाजपनं मुंबई महापालिकेसाठी ३२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. यात माजी उपमहापौर विद्या ठाकूर यांच्यासह चार नगरसेवकांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. भाजपमधलं गटातटाच्या राजकारणाचा समन्वय साधण्याचा प्रयत्न यात करण्यात आला. यात मुंडे गटाच्या सात जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर विनोद तावडे यांच्या ८ समर्थकांना उमेदवारी मिळाली आहे. दहा नगरसेवकांना संधी मिळाली आहे.

 

माजी उपमहापौर विद्या ठाकूर यांना उमेदवारी मिळालेली नाही. गोपीनाथ मुंडे यांचे माजी पीए आणि भाजयुमोचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि किरीट सोमय्यांचे माजी पीए दीपक दळवी यांनाही उमेदवारी मिळाली आहे. मोहन मिठबावकर, शैलजा गिरकर, मनोज कोटक, दिलीप पटेल, महेश पारकर, सिताराम तिवारी, राम बारोट या ज्येष्ठ नगरसेवकांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

 

मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. भाजप मनपा निवडणुकीसाठी पहिली यादी आज जाहीर करत आहे. महाय़ुतीत भाजपच्या वाट्याला ६३जागा आल्या असून, यापैकी ३०ते ३५ उमेदवारांची ही पहिली यादी असेल. मुंबईचे भाजप अध्यक्ष राज पुरोहित पत्रकार परिषदेतही यादी जाहीर करतील. कुणाचा पत्ता कापणार, आणि कुणाला तिकीट मिळणार याची उत्सुकता आहे.