www.24taas.com, नवी दिल्ली
रेल्वे मंत्र्यांच्या काही घोषणांमुळे मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळू शकणार आहे. मुंबईसाठी मुंबईसाठी ७५ नव्या लोकल गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे गर्दीचा प्रवास काही प्रमाणात सुखर होणार आहे. अर्थात रेल्वे मंत्र्यांनी दिलेली आश्वासने किती काळात प्रत्यक्षात येतील त्यावर सारं काही अवलंबून आहे.
पश्चिम रेल्वे लोकल सेवेपाठोपाठ आता मध्य रेल्वेची लोकल सेवाही डीसीची एसी होणार आहे त्यामुळे ती अधिक वेगवान होईल अशी अपेक्षा आहे. पनवेल ते विरार मार्ग जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसंच अनेक वर्षे प्रलंबित राहिलेल्या चर्चगेट विरार फास्ट कॉरिडॉरसाठी अभ्यास सुरु आहे.
मुंबईसाठी ७५ नव्या लोकल गाड्या
पॅसेंजरचा वेग ताशी १६० किमी नेण्याचा प्रयत्न
पाच वर्षात सिग्नल यंत्रणेसाठी ३९ हजार ११० कोटी
नवी मुंबई आणि पनवेलमध्ये नवीन कोचिंग संस्था
मुंबई लोकलमध्ये १५०० नवे डबे जोडले गेले
मुंबई ईस्ट-वेस्ट जोडण्यासाठी अभ्यास सुरू
हार्बर लाइनवर १२ डब्यांसाठी लवकरात लवकर प्रयत्न करणार
मुंबई- वेस्टर्न रेल्वेनंतर आता मध्य रेल्वेही डीसीची एसी होणार
पनवेल ते विरार जोडण्याचा प्रयत्न सुरू
चर्चगेट विरार फास्ट कॉरिडोअरसाठी अभ्यास सुरू
मुंबईसाठी एमयूटीपी-३ ची घोषणा
मार्केटिंगवर भर दिला जाईल
सीएसटी-कल्याण दरम्यान नवीन रेल्वे कॉरिडोर