शिवसेनेच्या 'संजय'ची काँग्रेसच्या 'संजय'वर टीका

संजय निरुपम यांच्या मुंबई बंद पाडू या वक्तव्याचा शिवसेनेचे खासदार तथा सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. संजय निरुपम हा वेडा माणूस असल्याचे म्हटले आहे.

Updated: Oct 25, 2011, 01:52 PM IST

 झी २४ तास वेब टीम, मुंबई  

संजय निरुपम यांच्या मुंबई बंद पाडू या वक्तव्याचा शिवसेनेचे खासदार तथा सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. संजय निरुपम हा वेडा माणूस असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे..

सोमवारी शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरेंनी निरुपम यांनी मुंबई बंद करण्याचे धाडस करुन दाखवावे त्यांचे दात घशात घालु असे म्हटले होते. त्यानंतर खासदार राऊत यांनी मंगळवारी संजय निरुपम यांना वेडे म्हटले आहे.

राऊत म्हणाले, 'निरुपम यांचे काँग्रेसमध्ये कोणतेही अस्तित्व राहिलेले नाही. त्यांना मटका लागल्यासारखे ते निवडून आले आहेत. यापूढे ते कुठल्या नगरपालिकेतही निवडून येण्याची शक्यता नाही. पुन्हा त्यांना मटका लागणार नाही. निरुपम मराठी माणसाची थट्टा करत आहे. हे शिवसेना कधीही सहन करणार नाही. निरुपम जर मुंबई बंद करायची भाषा करत असेल तर त्याला त्याच्या कुटूंबीयांसह मुंबईबाहेर घालवू शकतो.'

खासदार संजय राऊत यांच्या या प्रतिक्रीयेने शिवसेना आणि निरुपम यांच्यातील वाद अधिकच वाढत चालला आहे.

Tags: