www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
मुंबईमध्ये आता रात्रीही हॉटेल, मेडिकल आणि दूधविक्री केंद्रे सुरू राहणार आहेत. नुकताच यासंदर्भात महापालिकेच्या महासभेत प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
यासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्यासाठी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरेंनी काल महापौरांच्या दालनामध्ये पत्रकार परिषद घेतली. मुंबईत रात्रभर सुरू असलेल्या उद्योग-व्यवसायांमधला लोकांना रात्रीही जेवण मिळावं या उद्देशानं मुंबईत रात्रभर रेस्टॉरंट सुरू रहावं अशी मागणी असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
मुंबईनंतर ठाणे, नाशिक आणि पुण्यातही रात्रभर रेस्टॉरंट आणि मेडीकल सुरू ठेवण्यात येणार असून तसा प्रस्ताव त्या त्या महापालिकांमध्ये मंजूर करण्यात येणारेय. रात्रभर रेस्टॉरंट सुरू ठेवण्याच्या संकल्पनेचं राष्ट्रवादीनं समर्थन केलंय.
24 तास हॉटेल खुली राहिल्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचं राष्ट्रवादीचं प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलंय. मात्र तरी सुध्दा हा निर्णय राज्यसरकारने घ्यायचा आहे. असं नवाब मलिकांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.