मुंबई : भाजपने जिल्हा परिषद निवडणुकीतही अव्वल क्रमांक पटकावलाय. २५ जिल्हा परिषदेतल्या एकूण १५०८ जागांपैकी भाजपने ४११ जागा जिंकल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसने ३७६ जागा जिंकत दुसरा क्रमांक पटकावला आहे. काँग्रेसने ३०७ जागा जिंकत तिसरा तर शिवसना चौथ्या क्रमांकवर फेकली गेली आहे. त्यांना फक्त २७४ जागा जिंकता आल्या आहेत.
२५ जिल्हा परिषदांपैकी फक्त ७ जिल्हा परिषदांमध्ये कुठल्या एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामध्ये भाजपनं वर्धा, चंद्रपूर, लातूर अशा तीन जिल्हा परिषदांमध्ये स्पष्ट बहुमत मिळावलंय. तर राष्ट्रवादीनं सातारा आणि पुणे अशा दोन जिल्हा परिषदांत स्पष्ट बहुमत मिळवलं आहेत. तर काँग्रेसनं सिंधुदुर्ग आणि शिवसेनेनं रत्नागिरी असं प्रत्येकी एका जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमत मिळवले आहे.
मित्र पक्षांच्या मदतीने भाजपचा ५ जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्ष होऊ शकतो. त्यामध्ये सांगली, जालना, औरंगाबाद, बुलढाणा आणि गडरचिरोलीमध्ये भाजपचा अध्यक्ष होऊ शकतो. तर सोलापूर, बीड, परभणी आणि उस्मानाबाद या चार जिल्हा परिषदांमध्ये राष्ट्रवादीचा अध्यक्ष होऊ शकतो. नांदेड, अमरावती आणि अहदमनगरमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपदाची काँग्रेसला संधी मिळू शकते. यवतमाळ, नाशिक आणि हिंगोलीमध्ये शिवसेनेचा अध्यक्ष होऊ शकतो. तर रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या मदतीने शेकापचा अध्यक्ष होऊ शकतो.