काँग्रेसनंतर राष्ट्रवादी, शिवसेनेचा आजपासून विधानसभेचा प्रचार

निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेसने प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर आता राष्ट्रवादी कांग्रेसही आज प्रचाराचा नारळ फोडणार आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नांदेडमध्ये प्रचाराला सुरुवात करणार आहेत.

Updated: Sep 6, 2014, 08:52 AM IST
काँग्रेसनंतर राष्ट्रवादी, शिवसेनेचा आजपासून विधानसभेचा प्रचार title=

मुंबई : निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेसने प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर आता राष्ट्रवादी कांग्रेसही आज प्रचाराचा नारळ फोडणार आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नांदेडमध्ये प्रचाराला सुरुवात करणार आहेत.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थिती राष्ट्रवादी आपला प्रचार सुरू करणार आहे. या कार्यक्रमात पक्षाचे प्रचार गीत आणि जाहिरांतींचे अनावरणही केलं जाणार आहे. मुंबईत आज प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक इथे पक्षाचे मोठे मेळावे होणार आहेत. काँग्रेसनं आपल्या प्रचारात नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं होतं आता राष्ट्रवादीच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी कुठला मुद्दा असेल याबाबत उत्सुकता आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नांदेडमध्ये विधानसभेच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. नांदेडमध्ये आज  ते आपली जाहीर सभा घेणार आहेत. राष्ट्रवादी कांग्रेसचे माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आयोजीत केलेल्या मेळाव्यासही उद्धव ठाकरे उपस्थीत रहातील. लोहा येथी मोंढा मैदानावर सकाळी अकरा वाजता ही सभा होणार असून सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.