आदित्य तिवारी, मुंबई : मुंबईतील वांद्रे भागात एका मद्यपी तरुणीनं पोलिसांना तब्बल दोन तास वेठीस धरलं. तथाकथित उच्चभ्रू समाजातल्या या महिलेनं पोलिसांना आणि पत्रकारांना शिविगाळ करणं, मारण्याची धमकी देणं असले प्रकार केले. शिवानी बाली असं या महिलेचं नाव आहे.
नाकाबंदीमध्ये शिवानीनं मद्यपान केल्याचं आढळलं. मात्र गाडी न थांबवता तिनं पळ काढला. अखेर पोलिसांनी पाठलाग करून तिची गाडी थांबवल्यानंतर तिनं कारचे चारही दरवाजे बंद केले. काचा बंद केल्या आणि स्वतःला कोंडून घेतलं. गाडीत बसूनच तिनं सिगारेटचं जवळजवळ एक पाकीट संपवलं.
पोलीस तिची समजून घालण्याचा प्रयत्न करत होते. मात्र मोठ्या आवाजात स्टिरिओ लावून ही महिला शिविगाळ करत गाडीतच बसून होती. लॉक उघडण्यासाठी एका व्यक्तीला आणल्यानंतर त्याचं साहित्यही तिनं खेचून घेतलं. अखेर पोलिसांनी गाडीची काच तोडून तिला बाहेर काढलं तेव्हा गाडीत सिगारेटच्या थोटकांचा खच पडलेला आढळला. बाहेर काढल्यावरही तिचं शिविगाळ करणं सुरूच होतं.
माझ्या वडिलांना सांगाल तर खबरदार, असं ती पोलिसांनाच बजावत होती. दोन-आडीच तास हा ड्रामा सुरू होता. अखेर पोलिसांनी अखेर ३ हजार २०० रुपयांचा दंड ठोठावून पोलिसांनी शिवानीला सोडून दिलं. मात्र या घटनेमुळे मुंबईतल्या सॉ कॉल्ड उच्चभ्रू समाजाची मुजोरी पुन्हा एकदा दिसून आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.