मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आदर्श सोसायटी गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी, अशोक चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आदर्श प्रकरणात चव्हाण आरोपींच्या यादीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने चव्हाण यांची याचिका दाखल करून घेत, त्यावर २४ एप्रिलला सुनावणी होणार असल्याचे म्हटले आहे. तसेच महाराष्ट्र सरकारला या प्रकरणात आतापर्यंत झालेल्या सुनावणीचे तपशील देण्यास सांगितले आहे.
आदर्श गैरव्यवहार प्रकरणात आरोपींच्या यादीतून आपले नाव वगळण्यासाठी अशोक चव्हाण यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळली होती. आता या निर्णयाविरोधात चव्हाण यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
मुंबईतील कुलाबा येथे कारगिल युद्धातील शहीदांच्या पत्नीसाठी आदर्श ही इमारत बांधण्यात आली होती. मात्र या इमारतीतील बहुसंख्य फ्लॅट हे अधिकारी व राजकीय नेत्यांनी लाटल्याचे उघड झाले होते. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना हा घोटाळा झाला आणि त्यामुळेच चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.