मुंबई : गोवंश हत्याबंदीबाबत मुंबई हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय़ दिलाय. राज्यातली गोवंश हत्याबंदी कायम ठेवतानाच हायकोर्टानं लोकांचा खाण्याचा मुलभूत अधिकारही कायम ठेवलाय.
गोवंशाची हत्या, सार्वजनिक ठिकाणी बंदी कायम ठेवलीये. मात्र घरात बीफ बाळगणं हा मात्र गुन्हा मानण्यात येणार नाही, असं हायकोर्टानं स्पष्ट केलंय.
यासोबतच अन्य राज्यांमधून गोमांस आणण्यावरील बंदी न्यायालयानं उठवलीये. न्यायमूर्ती ए.एस ओका आणि एस सी गुप्ते यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
फेब्रुवारी २०१५मध्ये गोवंश हत्याबंदी कायद्यावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी स्वाक्षरी केल्याने हा कायदा राज्यात लागू कऱण्यात आला होता.