खडसे मुद्यावर भाजपने शिवसेनेला फटकारलं

एकनाथ खडसे प्रकरणात भाजपने शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे, एकनाथ खडसे यांच्याबाबत निर्णय घेण्यास भाजप सक्षम आहे, एकनाथ खडसे हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे.

Updated: Jun 2, 2016, 03:48 PM IST
खडसे मुद्यावर भाजपने शिवसेनेला फटकारलं title=

मुंबई : एकनाथ खडसे प्रकरणात भाजपने शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे, एकनाथ खडसे यांच्याबाबत निर्णय घेण्यास भाजप सक्षम आहे, एकनाथ खडसे हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे.

शिवसेनेने या विषयात लुडबूड करू नये असा इशारा, भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी शिवसेनेला दिला आहे. यापूर्वी, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ खडसे यांनी राजीनामा द्यावा असं म्हटलं होतं. 

भोसरी एमआयडीसी येथील जमीन खरेदीचा मुद्दा आणि दाऊदशी कथित संभाषण प्रकरणी राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. या मागणीला भाजपच्या माधव भांडारी यांनी उत्तर दिलं आहे.