www.24taas.com, मुंबई
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘बोईंग-७८७ ड्रीमलाईनर’ विमान एअर इंडियाच्या ताफ्यात सामील होण्यासाठी मुंबईत दाखल झालंय. मुंबई विमानतळावर ड्रीमलाईचे जंगी स्वागत करण्यात आलं.
२० टक्के इंधन बचत, लांब पल्ल्याचं आणि मध्यम आकार ही बोईंग ७८७ प्रवासी मनाची वैशिष्ट्यं. ड्रीमलाईनर या विमानात बिझनेस क्लाससाठी १८ सीट्स तर इकॉनॉमी क्लाससाठी २३८ जागा आहेत. दोन मजल्यांच्या या विमानात २५० यात्रेकरूंना घेऊन १४,२०० ते १५,२०० किमी पर्यंत प्रवास करता येऊ शकेल. या विमानाची अंतर्गत रचना एखाद्या शाही महालासारखी सजवण्यात आलीय. नुकतंच, भारत सरकारच्या विधी आणि न्यानय मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यालनंतर ड्रीमलायनर एअर इंडियाच्या ताफ्यात सामील झालंय. इतर विमानांच्या तुलनेत या विमानाला २० टक्केल कमी इंधनाची गरज लागते. याच्या् निर्मितीसाठी अॅल्युमिनीअम ऐवजी कार्बन कम्पोतजिटचा वापर करण्यांत आला आहे.
एअर इंडिया अमेरिकेच्या उत्पादकाकडून २०१६ पर्यंत आणखी २६ ड्रीमलायनर विमानं खरेदी करणार आहे. हे विमान २००८ मध्ये सर्वात प्रथम भारतात येणार होते आणि उर्वरीत विमानांची डिलीव्हयरी ऑक्टोबर २०११ पर्यंत होणार होती. मात्र वेगवेगळया कारणांमुळे ती मिळण्याेस विलंब झाला.