मुंबई : किंगफिशर एअरलाइन्सचे मालक विजय मल्ल्या यांच्या मुंबई, गोवा, बंगळुरूसह अन्य ठिकाणची घर आणि कार्यालयांवर सीबीआयने छापे मारलेत.
किंगफिशर एअरलाइन्सने आयडीबीआय बँकेकडून कर्ज घेतले होते. ९०० कोटी रुपयांच्या थकबाकीप्रकरणी विजय मल्ल्या यांच्या घरी आणि कार्यालयावर सीबीआयने छापा टाकला.
मल्ल्या यांच्या मुंबई, गोवा, बंगळुरूसह अन्य ठिकाणची घरे आणि कार्यालयांवर हा छापा मारला. बँकेच्या नियमांचे उल्लंघन करून त्यांना कर्ज देण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.
यासंदर्भात मल्ल्या, किंगफिशर एअरलाइन्सचे मुख्य वित्तीय अधिकारी ए रघुनाथन आणि आयडीबीआय बँकेच्या काही अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.