मुंबई : पूर्व ध्रुतगती महामार्गावर दारूच्या नशेत भरधाव कार चालवून दोघांचा जीव घेणारी वकील जान्हवी गडकर हिच्या विरोधात मुंबई पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. जान्हवी ही सध्या जामीनावर सुटली आहे.
मुंबई पोलिसांनी ५६० पानांचे हे आरोपपत्र दाखल केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. पूर्व ध्रुतगती महामार्गावर १० जूनला विरुद्ध दिशेने भरधाव कार चालवून जान्हवीने एका टॅक्सीला धडक दिली. या भीषण अपघातात दोघे जागीच ठार झाले.
याप्रकरणी जान्हवीला अटक करण्यात आली होती. ५ ऑगस्टला न्यायालयाकडून तिला जामीन मिळाला होता. सोमवारी मुंबई पोलिसांनी तिच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. यामध्ये ५७ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. १४ साक्षीदारांची जबानी न्यायालयातच घेण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.