मुंबई : तुमच्या मोबाईलवर नेटवर्क (रेंज) दिसतंय का?, असेल तर नेटवर्क बिझी आहे का?, हे तपासा, कारण काही प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या मोबाईल कंपन्यांनी प्रमाणापेक्षा अधिक मोबाईल कनेक्शन्स दिल्याने नेटवर्क सतत व्यस्त आहेत, यामुळे फोन कॉल लागत नाहीत, आणि मोबाईलवरील नेटवर्किंग गायब होत असल्याच्या अडचणी मुंबईत आणि उपनगरात वाढत आहेत.
मोबाईल कंपन्यांनी कुणालाही न जुमानता इंटरनेटच्या दरात १०० टक्के वाढ केली आहे. म्हणजे जर तुम्ही सध्या इंटरनेटसाठी महिन्याला ५०० रूपये मोजत असाल, तर आता तुम्हाला १ हजार रूपये मोजावे लागतील.
विशेष म्हणजे हे पैसे मोजल्यानंतरही तुम्हाला अधिक चांगली सेवा मिळण्याची कोणतीही शाश्वती नसेल, कारण नेटवर्क बिझी आणि मोबाईल फोन्सचे कनेक्शन्स जास्त अशी अवस्था सध्या काही मोबाईल कंपन्यांची झाली आहे.
या उलट तुम्ही जास्त चर्चेत नसलेल्या मोबाईल कंपन्यांची कनेक्शन्स घेतली तर यावर इंटरनेटचा स्पीडही चांगला मिळतोय. तरीही कुणावरही विश्वास न ठेवता, तुमच्याकडे ड्युअल सिम मोबाईलची सुविधा असेल, तर स्वत: निरिक्षण करून पाहण्यास हरकत नाही.
मोबाईल कंपन्यांचा कुणालाही न जुमानता भाडेवाढ करण्याकडे कल आहे. मात्र प्रमाणापेक्षा जास्त कनेक्शन्स दिल्यानं मोबाईल नेटवर्क बिझी असल्याची टेप ऐकवली जात आहे, आणि मोबाईल नेटवर्क गायब होण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पण तुमच्या मोबाईल नेटवर्किंग कंपनीकडे तक्रार करायला विसरू नका, कारण तुमचा फिडबॅक कंपन्यांसाठी तेवढाच महत्वाचा आहे, नेटवर्क बिझीची तक्रार करतांना कॉल सेंटरकडून तक्रार नोंदवल्यानंतर कम्पलेंट नंबर घ्यायला विसरू नका.
जास्तच त्रास झाल्याने हैराण झालेल्या अनेक ग्राहकांनी मोबाईल पोर्टेबिलिटीचं शस्त्र उपसलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.