मुंबई : महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी थेट गुजरातमधील तरुण नेते हार्दिक पटेल यांनाच मुंबईच्या मैदानात उतरवले आहे. मात्र, भाजपने याचा जोरदार समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केलेय. पायाखलची वाळू सरकरल्याने हार्दीक पटेलला बोलवावे लागल्याचे म्हटले आहे.
गुजराती मत आकर्षित करण्यासाठी गोरेगावमध्ये हार्दीक पेटल सभा घेणार आहे. तर दुसरीकडे याच वेळी भाजपनं मुंबईकरांसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. त्यामुळे एकमेकांना शह देण्यासाठी भाजप-शिवसेनेत जोरदार चढाओढ आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच शिवसेनेला हार्दीक पटेलला बोलवावे लागले, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे. भाजपच्या जाहीरनामा प्रकाशनावेळी ते बोलत होते.