मुंबई : मुंबईतील समुद्रकिनारी मरिनड्राईव्हवर दगडांमध्ये एक डॉल्फीनसारखा मासा मृतावस्थेत आढळून आला आहे. मरिन ड्राईव्हच्या किनारी हा मासा वाहून आला असल्याचं सांगण्यात येत आहे.
मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फीन दिसत नसले तरी, हा मासा किनारी आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
मात्र गंभीर बाब म्हणजे डॉल्फीनसारखा मासा मृतावस्थेत आढळल्याने, मुंबईच्या समुद्रकिनारी पाण्यात मोठ्या प्रमाणात प्रदुषण असल्याचं स्पष्ट होतंय. हा मासा पाण्यातील प्रदुषणाचा शिकार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या माशाचं वजन एवढं होतं की, त्याला जेसीबी मशीनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आलं. मरिन ड्राईव्हवर हा मासा पाहून सर्वचं आश्चर्यचकीत झाले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.