डेक्कन क्वीनची डायनिंग कार सेवा पुन्हा सुरु

मुंबई आणि पुण्याला जोडणाऱ्या दख्खनची राणी म्हणजेच डेक्कन क्वीनने प्रवास करणा-यांसाठी गुडन्यूज. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून बंद असलेली डेक्कन क्वीनची डायनिंग कार सेवा पुन्हा सुरु होणार आहे.

Updated: May 30, 2015, 04:32 PM IST
डेक्कन क्वीनची डायनिंग कार सेवा पुन्हा सुरु  title=

मुंबई : मुंबई आणि पुण्याला जोडणाऱ्या दख्खनची राणी म्हणजेच डेक्कन क्वीनने प्रवास करणा-यांसाठी गुडन्यूज. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून बंद असलेली डेक्कन क्वीनची डायनिंग कार सेवा पुन्हा सुरु होणार आहे.

१ जून २०१५ रोजी डेक्कन क्वीनला ८६ वर्षे पूर्ण होत आहेत. ही डायनिंग कार सेवा पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतलाय. देशातील पहिली लक्झरी रेल्वे म्हणून मान मिळवलेल्या दख्खनच्या राणीतील डायनिंग कार म्हणजेच चाकांवर चालणारे उपहारगृह हे विशेष आकर्षण होते. 

८५ वर्षे रेल्वेसोबत असलेला हा डबा आयुर्मान संपल्याचे कारण देत प्रशासनाने काढून टाकला होता. मात्र प्रवाशांच्या मागणीमुळे ८६व्या वाढदिवसाचे निमित्त साधत डायनिंग कारची सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.