www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलनाके आणि कॅम्पा कोला संदर्भात सर्वप्रथम झी 24 तासकडे प्रतिक्रिया दिलीय... वरळीमधल्या कॅम्पा कोलावर कारवाई होऊ नये, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडलीय...
रहिवासी अनधिकृत बांधकामांना जबाबदार नसल्याचं राज यांनी म्हटलंय. या अनधिकृत बांधकामांना जबाबदार असलेल्या बिल्डर, प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही? असा सवालही त्यांनी केलाय.
तर राज्यातील 44 टोल नाके बंद केल्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर लगेचच आनंद व्यक्त करणार नाही. आधी रद्द केलेल्या टोल नाक्यांची माहिती तपासून घेणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. 65 टोलनाके बंद करण्याची घोषणा राज्य शासनानं यापूर्वीच केली होती. त्यापैकीच हे टोलनाके आहे का हे बघावं लागणारेय...
तसंच मुंबई, ठाण्यातले टोलनाके बंद करण्याचा निर्णय झालाय का? हेही बघावं लागेल असं राज ठाकरेंनी म्हटलंय. टोलनाके बंद केले जात असतील तर याचा अर्थ मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी केलेलं आंदोलन योग्य असल्याची प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.