मुंबई : डॉक्टरांनी अखेर आपला संप मागे घेतला आहे. मुंबईत सह्याद्री अतिथिगृहावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मॅग्मोच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक सुरू आहे.
या बैठकीत हा निर्णय झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे मागील सहा दिवसांपासून राज्यात डॉक्टरांचा संप मागे घेण्यात सरकारला यश आलं आहे.
सरकारी रूग्णालयातील सर्वच डॉक्टर संपावर असल्याने रूग्णांचे हाल होत होते.
अनेक ठिकाणी रूग्णांना उपचाराविना जीव गमवावा लागला आहे. सरकारी डॉक्टरांनी संप पुकारल्याने रूग्णांची खासगी रूग्णालयात गर्दी झाली होती. आता खासगी रूग्णालयातील गर्दी कमी होईल अशी अपेक्षा आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.