मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्षातून बाहेर पडलेल्यांशी संबंध न ठेवण्याचे आदेश मनसे कार्यकर्तांना दिले आहेत. याचा पहिला ट्रेलर राज यांनी मुंबईतल्या मनसे नगरसेवकांच्या घेतलेल्या बैठकीत पाहायला मिळाला.
मनसेचा राजीनामा दिलेल्या प्रवीण दरेकर यांचे बंधू आणि मनसेचे नगरसेवक प्रकाश दरेकर हेदेखील या बैठकीला हजर राहण्यासाठी कृष्णकुंजवर दाखल झाले. मात्र राज ठाकरेंनी प्रकाश दरेकर यांना बैठकीतून बाहेर जाण्यास सांगितलं. त्यामुळं प्रकाश दरकेर कृष्णकुंजवरून लगेचच बाहेर पडले.
मनसेचा राजीनामा दिलेल्यांशी कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवू नये, असे आदेशच या बैठकीत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले. त्यामुळं प्रवीण दरेकर, वसंत गीते आणि अतुल चांडक यांच्याशी संबंध ठेवण्यास मज्जाव करण्यात आलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.