मुंबई : मला माझी साडी घालण्याची लाज वाटत नाही, त्यामुळे बुरखा घालण्याची लाज वाटण्याची गरज नाही. साडी माझ्या संस्कृतीचा भाग आहे, तसाच बुरखाही आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलं आहे.
मुंबईमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही सल्ला दिला आहे. आजचा जमाना वेगळा आहे. बाहेर काही बोलायचं असेल तर सांभाळून बोला आणि खरं बोलायचं असेल तर ते कानात बोला, असं कार्यकर्त्यांना सांगितलं असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.