मुंबई : कुर्ला दुर्घटनेनंतर आता मुंबईतील प्रत्येक हॉटेल, रेस्ट्राँरन्टची तपासणी होणार असून सोमवारपासून प्रत्येक वॉर्डनिहाय तपासणी करण्यात येणार आहे. पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी ही माहिती दिलीय.
या तपासणी विभागात अग्निशमन दलाचे अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारीही असतील. अग्निसुरक्षा नसल्यास कायद्यानुसार कारवाई होणार आहे. प्रत्येक विभागात रोज किमान 10 हॉटोल्सची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आलेत. क्लास 2 आणि क्लास 3 हॉटेल्सची आधी तपासणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, कुर्ल्याच्या सीटी किनारा हॉटेलमचा मालक फरार झालाय. मालक शरद त्रिपाठी याच्याविरोधात विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. सदोष मनुष्यवध, आग आणि ज्वलनशील पदार्थांबाबत निष्काळजीपणाचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आलाय. तर या स्फोटा प्रकरणी आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिलेत. वॉर्ड आयुक्तांना 15 दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तर आज विक्रोळीत गॅस सिलेंडर स्फोट झाल्याची घटना घडलीय. विक्रोळी पार्कसाईट इथल्या वर्षानगरच्या आंबेडकर सोसायटीतील क्रांती चाळीतील एका घरात हा स्फोट झाला. ज्यामध्ये आठ जण जखमी झालेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.