www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मंत्रालय ते थेट चेंबूरपर्यंत विना अडथळा असणाऱ्या इस्टर्न फ्री वेवर दरड कोसळली आहे. त्यामुळे मार्ग एका बाजून काही काळ बंद झाला होता. दरम्यान, इस्टर्न फ्रिवेच्या कामावरुन आता राजकारण रंगू लागलंय.
राष्ट्रवादीनं काँग्रसवर निशाणा साधलाय. उदघाटनाची घाई का केली, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय. मीडीयाच्या दबावाखाली घाईघाईत उदघाटन केल्याचं मलिक यांनी म्हटलंय. इस्टर्न फ्रिवेवर दरड कोसळली, याला काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची पुन्हा एकदा ठिणगी पडली आहे.
त्याआधी लोकसभेच्या जागा वाटपाच्या मुद्यावरुन काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस मधील मतभेद मिटण्याऐवजी वाढलेत. काल रात्री पार पडलेल्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये काँग्रेसने राष्ट्रवादी कडून जागा वाटपाच्या मुद्यावरुन केल्या जाणा-या विधानांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. २००४ आणि २००९च्या जागावाटपाची चर्चा राज्यातच व्हावी, अशी कॉग्रेसची ठाम भूमिका आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसने जागावाटपाची जागा दिल्लीत झाली असल्याचे स्पष्ट केलं आहे. दोन्ही पक्ष या मुद्यावरुन ठाम असल्याने समन्वय समितीच्या बैठकीतही या विषयावर तोडगा निघाला नाही.
दरम्यान, राष्ट्रवादीवर नारायण राणे यांनी `प्रहार` केलाय. राष्ट्रवादीकडून कधीही दगाफटका होण्याची भीती उद्यागमंत्री नारायण राणे यांनी केली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत पुन्हा एकदा नव्याने वाद उभा राहण्याची चिन्हे आहेत. त्यातच काल झालेल्या बैठकीत दोन्ही काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून ठिणगी पडली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.