www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कोकणच्या इको झोनवर कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. इको झोनच्या निर्णयामुळे कोकणवासीयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार होणं गरजेचं आहे, असं भुजबळ यांनी म्हटलंय. भुजबळ यांनी उद्योगमंत्री नारायरण राणे यांना पाठिंबा दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेसविरोधात राष्ट्रवादीही उतरल्याचे चित्र आहे.
दरम्यान, मुंबईतील हेरिटेजमुळे मुंबईतील इमारतींच्या पुर्नविकासाला खोळंबा बसलाय, असंही ते यावेळी म्हणालेत. हेरिटेजला आधी जयंत पाटील यांनी विरोध दर्शविला होता. तर शिवसेनेनेही विरोध केलाय. ज्या ठिकाणी हेरिटेजला मान्यता देण्यात आली आहे. तेथील लोकांचाही विरोध आहे. आता भुजबळ यांनीही यावर विचार करा, असा सल्ला दिलाय.
कोकणाचा विकास होत नसेल तर उपयोग काय? कोकणचा विकास झाला पाहिजे. मी, कोकण विकासासाठी कोणी आड येत असेल तर ते जमणार नाही. वेळप्रसंगी मी राजीनाम देईन, अशी धमकी राणे यांनी दिली. कोकणातील १९२ गावे इको सेंसेटीव्ह जाहीर केल्यामुळे राणे प्रचंड नाराज झाले आहेत. ही नाराजी त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत उघड केली. या निर्णयामुळे कोकणचा विकास ठप्प होईल, अशी भीती राणे यांनी व्यक्त केली आहे.
वनविभागाचे अधिकारी पुन्हा कोकणात गेल्यास कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल, अशा गर्भित इशाराही राणे यांनी यावेळी दिला. मी राजीनामा देऊन कस्तुरीरंगन समितीविरोधात आंदोलन करीन, असे राणे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीतच बजावले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कस्तुरीरंगन समितीचा अहवाल स्वीकार की नाही? याकडे लक्ष लागले आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.