मुंबई : विविध आरोपांमुळं टीकेचे धनी ठरलेले एकनाथ खडसे यांना महसूलमंत्रीपदावर पाणी सोडावं लागणार, अशी चिन्हं दिसतायत...
महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर सध्या एकामागून एक आरोपांचा भडीमार सुरूय... कुख्यात माफिया डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी फोनवरून कथित संभाषण, पत्नीच्या नावानं एमआयडीसीची जमीन खरेदी, विशिष्ट कंत्राटदारावर मेहेरनजर यामुळं खडसे अडचणीत आलेत.
खडसेंबाबत मुख्यमंत्रीच योग्य निर्णय घेतील, असं संकेत भाजप पक्षश्रेष्ठींनी दिले होते. दरम्यान, खडसेंनी आज वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
या भेटीमागं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलेल्या दाव्याची पार्श्वभूमी असल्याची चर्चा आहे. खडसेंनी खरेदी केलेली जमीन ही एमआयडीसीचीच असल्याचा दावा देसाईंनी केलाय. त्यांच्या या विधानामुळं खडसे चांगलेच अडचणीत आलेत.