मुंबई : विधीमंडळात भ्रष्टाचाराच्या मुद्यावर जोरदार चर्चा रंगली. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंनीही या चर्चेत भाग घेतला. यावेळी खडसेंनी भ्रष्टाचाराचे सर्व आरोप खोड़ून काढले.
पुराव्यांविनाच राजीनामा द्यावा लागला याचं मोठं दु:ख आहे अशी खंत खडसेंनी व्यक्त केली. आज जी वेळ माझ्यावर आली आहे ती उद्या तुमच्यावर येणार असल्याचा इशारा त्यांनी सभागृहातल्या सदस्यांना दिला.