मुंबई : मुंबईतील तापमानात मागील दोन ते तीन दिवसांपासून वाढ झाली आहे. यामुळे मुंबईकर संध्याकाळी देखिल घामांच्या धारांनी न्हावून निघतात. मुंबईचं किमान तापमान ३० अंश सेल्सिअसवर आहे. यामुळे संध्याकाळीही तापमानात फारसा बदल होत नसल्याने मुंबईकर उकाळ्याने हैराण आहेत.
मुंबईकरांना या उकाळ्यापासून मान्सून पूर्व सरी दिलासा देतील असं म्हटलं जातं, पण मान्सून आणखी एक-दोन दिवस उशीरा येत असल्याचा अंदाज हवामान खात्याचा आहे, दरम्यान मुंबईत ११ ते १४ जून पर्यंत मान्सून दाखल होईल, असा अंदाज स्कायमेट या खासगी संस्थेने व्यक्त केला आहे.
मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर काही दिवसांनी तापमान कमी होणार असल्याचंही म्हटलं जात, मात्र आणखी एक दोन दिवस मुंबईकरांना तापमानाचा त्रास सहन करावा लागणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.