तुमचा फेसबुक फोटो होणार आणखी 'बहारदार'

तुम्ही तुमच्या फेसबुक प्रोफाईल पेजवर आता सात सेकंदाचा फेसबुक प्रोफाईल व्हिडीओ अपलोड करू शकतात. ही सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार आहे, फेसबुक प्रोफाईल फोटोवर आणखी काही वेगळे बदल करणार आहे, त्यामुळे वापरकर्त्याला त्याचं प्रोफाईल आणखी आकर्षकपणे मांडता येणार आहे. प्रायव्हसी सेटिंगमधून तुम्हाला तुमचा प्रोफाईल व्हिडीओ सेट करता येणं सोपं होणार आहे.

Updated: Oct 1, 2015, 05:36 PM IST
तुमचा फेसबुक फोटो होणार आणखी 'बहारदार' title=

मुंबई : तुम्ही तुमच्या फेसबुक प्रोफाईल पेजवर आता सात सेकंदाचा फेसबुक प्रोफाईल व्हिडीओ अपलोड करू शकतात. ही सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार आहे, फेसबुक प्रोफाईल फोटोवर आणखी काही वेगळे बदल करणार आहे, त्यामुळे वापरकर्त्याला त्याचं प्रोफाईल आणखी आकर्षकपणे मांडता येणार आहे. प्रायव्हसी सेटिंगमधून तुम्हाला तुमचा प्रोफाईल व्हिडीओ सेट करता येणं सोपं होणार आहे.

फेसबुक प्रोफाईल फोटोत आणखी मोठे बदल करणार आहे, फेसबुकचा मोबाईल फोनच्या माध्यमातून दहा बिलियन महसूल वर्षाला जमा झाला आहे. हे अपडेट न्यू-यॉर्क सिटीज बाराव्या जाहिरातींच्या आठवड्यात आलं आहे, जेथे फेसबूक जगातील सर्वात मोठी जाहिरात कंपनी आणि जाहिरातमाध्यम म्हणून मोजलं जात आहे.

युझर्सना त्यांचा प्रोफाईल फोटोच्या जागी काही वेळेसाठी जुना फोटो सेट ठेवण्यात येणार आहे. युझर्ससाठी जे-जे क्षण महत्वाचे असतील, समजा एखादं सामाजिक काम, किंवा एखादा स्पोर्टस फोटो तुमचा, तो देखील थोडा-थोडा वेळ सेट करता येणार आहे.

फेसबुक प्रायव्हेट सेटिंग आणखी युझर्स फ्रेंडली करणार आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रांना कोणते फोटो दिसायला पाहिजेत, हे ठरवणं अधिक सोप होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.