मुंबई : तूरडाळीच्या किंमती नियंत्रित आणण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई न केल्याप्रकरणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
गिरीश बापट यांच्यासह या खात्याचे तत्कालीन सचिव दीपक कपूर यांच्याविरोधात लोकायुक्तांनी नोटीस बजावली आहे. गेल्यावर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत तुरडाळीचे दर ८० रुपये किलोवरुन थेट २०० रुपये किलोपर्यंत वाढले होते.
तेव्हा हे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी मंत्री म्हणून बापट यांनी आणि सचिव म्हणून दीपक कपूर यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचे लोकायुक्तांनी नोटीसीमध्ये म्हटले आहे. मुंबई ग्राहक पंचायतीने याप्रकरणी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानंतर ही नोटीस पाठविण्यात आली आहे.