आर. आर. पाटील यांची प्रकृती गंभीर पण स्थिर

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर.आर. पाटील यांची प्रकृती गंभीर पण स्थिर असल्याचं वृत्त आहे. पाटील यांच्यावर तोंडाच्या कॅन्सरची शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांच्यावर लिलावती हॉस्पिटल इथं उपचार सुरू आहेत. 

PTI | Updated: Jan 19, 2015, 02:58 PM IST
आर. आर. पाटील यांची प्रकृती गंभीर पण स्थिर title=

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर.आर. पाटील यांची प्रकृती गंभीर पण स्थिर असल्याचं वृत्त आहे. पाटील यांच्यावर तोंडाच्या कॅन्सरची शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांच्यावर लिलावती हॉस्पिटल इथं उपचार सुरू आहेत. 

त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं असून  त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक उपचार करत आहे. 

पाटील यांच्या तोंडात झालेल्या गाठीवर काही दिवसांपूर्वी मुंबईतील ब्रीच कॅण्डी हॉस्पिटल इथं शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना लीलावती हॉस्पिटलला दाखल करण्यात आलं. 

मोठ्या प्रमाणावर लोक भेटीला येत होते. त्यामुळं त्यांना इन्फेक्शन झालं. परिणामी त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.