गणपतीला दाखवायचा असा नैवेद्य

आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, गणपतीला दाखवायचा असा नैवेद्य. ज्यानं तुमचा गणपतीबाप्पा एकदम खूष होऊन जाईल. अतिशय क्रिएटीव्ह आणि इनोव्हेटिव्ह मोदकांची व्हरायटी खास तुमच्यासाठी.

Updated: Aug 29, 2014, 12:23 PM IST
गणपतीला दाखवायचा असा नैवेद्य title=

मुंबई : आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, गणपतीला दाखवायचा असा नैवेद्य. ज्यानं तुमचा गणपतीबाप्पा एकदम खूष होऊन जाईल. अतिशय क्रिएटीव्ह आणि इनोव्हेटिव्ह मोदकांची व्हरायटी खास तुमच्यासाठी. 

गणपतीबाप्पाच्या प्रसादासाठी गुलाब मोदक, बटरस्कॉच मोदक, चॉकलेट मोदक, ऑरेंग्ज मोदक, वेलची मोदक तयार आहेत. पण इथलं आकर्षण आहे ते ५१ किलोचा पनीर चिल्ड मोदक. ५१ किलोच्या या मोदकामध्ये ५१ वेगवेगळे फ्लेवर्स आणि १७ लेयर्स आहेत. प्रत्येक लेअरमध्ये वेगळी चव लागणार आहे. हा मोदक आरोग्यासाठीही चांगला असल्याचा दावा केला जातोय, कारण यामध्ये साखरेचा कमी वापर करण्यात आलाय. 

चिल्ड पनीर मोदकांशिवाय ४० प्रकारचे मोदक विलेपार्ल्यातल्या या दुकानात तयार आहेत. ज्यामध्ये ड्रायफ्रुट मोदकांचा समावेश आहे. हे मोदक पंधरा ते वीस दिवस टिकतात. एकाच दुकानात मोदकांची इतकी व्हरायटी मिळाल्यानं ग्राहकही खूष आहेत. 

दुसरीकडे दादरमधली मोदकांची दुकानंही गजबजली आहेत. या दुकानातही रंगीबेरंगी आणि वेगवेगळ्या फ्लेवर्सचे मोदक उपलब्ध आहेत. मावा मोदक ३२० रुपये किलो, काजू मोदक ६०० ते ८०० रुपये किलो, स्ट्रॉबेरी, गुलाब आणि चॉकलेट मोदक ८०० रुपये किलोनं उपलब्ध आहेत. 
 
गणपतीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक तयार आहेत. अतिशय टेम्टिंग वाटणारे हे मोदक खाण्यासाठी थोडा धीर धरावा लागणार आहे. एकदा का गणपतीला नैवेद्य दाखवून झाला की त्यावर ताव मारता येणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.