गॅस सिलिंडर घरपोच मिळणार नाही!

सिलिंडर वितरकांच्या संघटनेनं आज एक दिवसाचा संप पुकारलाय. त्यामुळे आज कुणालाही घरपोच सिलिंडर मिळणार नाही.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 1, 2012, 09:51 AM IST

www.24taas.com, मुंबई
सवलतीच्या दरामध्ये दिला जाणारा सातवा गॅस सिलिंडर नेमक्या कोणत्या दराने ग्राहकांना द्यायचा, याबाबतच्या कोणत्याही स्पष्ट सुचना या महिन्याच्या अखेरपर्यंत केंद्र सरकारने न दिल्यानं सिलिंडर वितरकांच्या संघटनेनं आज एक दिवसाचा संप पुकारलाय. त्यामुळे आज कुणालाही घरपोच सिलिंडर मिळणार नाही.
सबसिडीच्या सिलेंडरचा हिशोब ठेवण्याच्या सरकारीनिर्णयाला नकार देत घरगुती ( एलपीजी ) गॅस वितरकांनीआज एका दिवसाचा लाक्षणिक संप पुकारलाय. याबद्दलचा इशारा संघटनेनं अगोदरच दिला होता. त्यामुळे गॅस ग्राहकांना आज घरपोच गॅस सिलिंडर मिळणार नाही... पण, ग्राहकांना तातडीनं सिलिंडर हवा असल्यास गॅस एजन्सीमध्ये जाऊन तो घेता येईल.
याआधी सहा सिलिंडर सवलतीच्या दरात आणि त्यानंतरचे बाजारभावानुसार देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. पण याला विरोध झाल्यावर काँग्रेसशासित राज्यांनी ६ ऐवजी ९ सिलिंडर सवलतीत देणार असल्याची घोषणा केली होती. पण सातवा सिलिंडरच्या किंमतीबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे. शिवाय गॅस वितरकांना प्रत्येक ग्राहकानं एका वर्षात किती सिलेंडर घेतले याचा हिशोब ठेवावा लागणार आहे. त्याचा निषेध म्हणून आजचा हा संप पुकारण्यात आलाय.