मुंबई : विद्याविहारमध्ये गॅस सिलिंडरच्या स्फोटात ८ जण ठार झालेत. हे कॉलेज विद्यार्थी असल्याचे पुढे आलेय. हॉटेल व्यवसाईच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना झाल्याचा आरोप अबू आझमी यांनी केलाय.
कुर्ला पश्चिमेकडील सिटी किनारा नावाच्या हॉटेलमध्ये दुपारी ही भीषण दुर्घटना घडली. या सर्व मृतदेहांची आता ओळख पटली असून, मृतांपैकी सातजण शेजारच्या डॉन बॉस्को कॉलेजचे विद्यार्थी होते. हॉटेल व्यवसायीकाच्या हलगर्जी पणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप सपा नेते अबू आजमी यांनी केलाय.
या हॉटेलवर २०११मध्ये कारवाई करण्यात आली होती.. तळमजला अधिक एक मजला असं या हॉटेलचं बांधकाम असून, तिथं चायनीज फास्ट फूड तयार केलं जातं.तर वरचा भाग लोकांना जेवण्यासाठी ठेवलेला होता. गॅस सिलेंडरमधील गॅसची गळती होऊन ही आग लागली असावी, असा अंदाज अग्निशमन अधिका-यांनी व्यक्त केलाय. या आगीत हॉटेलमधील इलेक्ट्रिक वायर्स, लाकडी फर्निचरही जळून खाक झालंय.
कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर
दरम्यान, सिटी किनारा हॉटेलमध्ये आग लागण्याच्या आधीचं सीसीटीव्ही फुटेजही आता झी २४तासकडे उपलब्ध झालंय. त्यामध्ये हे डॉन बॉस्कोचे विद्यार्थी अगदी स्पष्ट दिसतायत.
गॅस सिलेंडरच्या दुर्घटनेत बळी पडलेल्यांचे पोस्टमार्टेम घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये केल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतले आहेत.
सायन कोळीवाडा इथं राहणारा आकाश थापर हा बावीस वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आलेल्या बहिणीला अश्रु अनावर झाले. मोनिकाचा छोटा भाऊ असलेला आकाश डॉन बॉस्को कॉलेजमध्ये आयटी इंजिनिअरिंगच्या तिस-या वर्षात शिकत होता. वडील पाच वर्षांपासून अंथरूणाला खिळून असल्यानं कुटुंबांचा एकमेव आधार आकाश होता. परंतु आता तोच निघून घेल्यानं कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.