'इतरांवरही दाखल होणार आरोपपत्र', महाजन यांचा नेम कुणावर?

भुजबळांनंतर आता इतर मंत्र्याच्या अडचणीतही वाढ होण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर राष्ट्रवादीच्या अडचणीही आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Updated: Feb 2, 2016, 07:45 PM IST
'इतरांवरही दाखल होणार आरोपपत्र', महाजन यांचा नेम कुणावर?   title=

मुंबई : भुजबळांनंतर आता इतर मंत्र्याच्या अडचणीतही वाढ होण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर राष्ट्रवादीच्या अडचणीही आणखी वाढण्याची शक्यता आहे.

जलसंपदा घोटाळ्याप्रकरणी महिनाभरात आरोपपत्र दाखल होणार आहे. अॅन्टी करप्शन ब्युरो येत्या महिनाभरात हे आरोपपत्र दाखल करणार आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरिश महाजन यांनी दिलीय. 

त्यामुळे माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे आणि अजित पवार यांच्या अडचणी आणखी वाढणार असल्याचं म्हटलं जातंय.