पालघर: फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली म्हणून पोलिसांनी डांबून ठेवलेल्या दोघा तरूणींना नुकसान भरपाई देण्याचे आदेश राष्ट्रीय मानवी हक्क आयोगानं दिलेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पालघरच्या या दोघा तरूणींनी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्यानंतर त्या दोघींना पोलिसांनी डांबून ठेवलं होतं. याप्रकरणी दोन्ही तरूणींना प्रत्येकी 50 हजार रूपये भरपाई द्या, असे आदेश आयोगाने राज्य सरकारला दिलेत.
या मुलींना डांबून ठेवणं म्हणजे भाषण स्वातंत्र्यावर गदा आणणं आहे, असं निरीक्षण आयोगानं नोंदवलंय. एवढंच नव्हे तर या तरूणींना नुकसानभरपाई दिल्याचे पुरावे 4 आठवड्यात सादर करा, असंही आयोगानं बजावलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.