www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
इंडियन बुलियन एंड ज्वेलर्स असोसिएशन म्हणजेच आयबीजीएने दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीपर्यंत सोनं प्रतितोळा 23 हजार ते 24 हजारापर्यंत येऊ शकतं.
भारतीय रिझर्व्ह बँकेने सोनं आयातीच्या नियमात सूट दिल्याने, सोन्याचा भाव पुढील काही दिवसात आणखी खाली येण्याची शक्यता आहे.
याशिवाय आयबीजीएला आगामी बजेटमध्ये सीमा शुल्कमध्ये आणखी कपात होण्याची अपेक्षा आहे.
आयबीजीएचे अध्यक्ष मोहित कंबोज यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेने सोनं आयातीच्या नियमात दिलेली सूट, हिरे आणि ज्वेलरी उद्योगासाठी सकारात्मक ठरणार आहे.
आयबीजीएला अपेक्षा आहे की, यापुढील बजेटमध्ये सीमा शुल्क 10 टक्क्यांवरून 4 ते 5 टक्के करण्यात येईल, ज्यामुळे दिवाळीपर्यंत किमती घसरून 23 हजार ते 24 हजार होण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.