लोकलमध्ये ग्रुपची दादागिरी सहन करायची का?

लांब पल्ल्याच्या लोकलमध्ये काही जण दमदाटी करुन प्रवाशांना मारहाण करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

Updated: Aug 7, 2014, 10:30 PM IST
लोकलमध्ये ग्रुपची दादागिरी सहन करायची का? title=

मुंबई : लांब पल्ल्याच्या लोकलमध्ये काही जण दमदाटी करुन प्रवाशांना मारहाण करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

खचाखच गर्दीत लोकलमध्ये जागा पकडणा-या प्रवशांना अप-डाऊन करणारे काही ग्रुप्स जागेवरून उठवण्यासाठी दादागिरी करतात.

प्रसंगी मारहाणही करत असल्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. ४ ऑगस्टला असाच प्रकार डहाणू लोकलमध्ये घडला, आणि याची चित्रफित प्रसिद्ध झाल्यानंतर या प्रकाराला वाचा फुटलीय.

मुंबईच्या सभ्यतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेचं एक्स्क्लुझिव्ह फूटेज झी २४ तासच्या हाती लागलंय. काही लोकल्समध्ये महिलांच्या बोगींमध्येही अशी गुंडगिरी सुरू असल्याचं बोललं जातय.

रेल्वेतील दादागिरीच्या विरोधात कुणीही तक्रार नोंदवली तर त्यावर 100 टक्के कारवाई होईल, असं आश्वासन पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरद चंद्रयत यांनी दिलंय.

लोकल ट्रेन ही कुणा एकाची नाही, सर्व प्रवाशांची आहे. जर कुणी दादागिरी करत असेल, कायदा हातात घेत असेल तर तक्रारी नोंदवा, असं आवाहन त्यांनी केलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.