www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सीबीएसई आणि आयसीएससी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता ‘एचएससी’ बोर्डाच्या निकालाचीही घोषणा करण्यात आलीय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं बारावीचा निकाल २ जून रोजी म्हणजेच येत्या सोमवारी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती दिलीय.
राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी आज ही माहिती जाहीर केलीय. २ जून रोजी दुपारी एक वाजल्यापासून मंडळाच्या वेबसाईटवर निकाल पाहता येतील, असं त्यांनी म्हटलंय.
www.mahresult.nic.in
www.msbshse.ac.in
www.mh-hsc.ac.in
www.hscresult.mkcl.org आणि
www.rediff.com/exam या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल.
राज्य मंडळाच्या दहावी, बारावीच्या परीक्षांच्या निकालाबाबत उत्सुकता वाढली होती. गेल्या वर्षी ३० मे रोजी बारावीचा निकाल जाहीर झाला होता. साधारणपणे मे महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ात बारावीचे निकाल राज्य मंडळाकडून जाहीर केले जातात. मात्र, यंदा मे महिन्याचा शेवटचा आठवडा संपायला आला तरी निकालाची तारीख जाहीर करण्यात आली नव्हती. त्यामुळे मंडळाकडे याबाबत सातत्याने विचारणा करण्यात येत होती. ५ जून रोजी निकाल जाहीर करण्यात येईल, असे मम्हाणे यांनी याआधीही स्पष्ट केलं होतं. आज त्यांनी ऑनलाईन निकाल जाहीर करण्याची तारीख आणि वेळ जाहीर केलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.