www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज ठाकरेंच्या कालच्या नवी मुंबईतल्या भाषणाची चौकशी होणार आहे. या भाषणात चिथावणीखोर वक्तव्य आढळल्यास कारवाई करणार असल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळं आता राज ठाकरेंच्या भाषणाची सीडी तपासली जाणार असल्याचं समजतंय.
टोल नाक्यांवरून आता राज्यात राजकारणाचा जोर चढलाय. टोल नाक्यांची तोडफोड केल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीय. राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना हिंसेला प्रवृत्त केल्याचा आरोप माणिकरावांनी केलाय. मुख्यमंत्र्यांनी मात्र टोलच्या मु्द्यावर बोलण्यास नकार दिलाय.
नवी मुंबईतल्या एका कार्यक्रमात रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलविरोधी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर. टोल नाक्यावर टोल भरू नका, कोणी आडवे आले तर फोडून काढा असा आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला. त्यानंतर रात्रीपासूनच टोलनाके फोडण्यास सुरूवात झाली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.