मुंबई : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत आमचा कोणाला पाठिंबा नाही. त्यांचे राजकारण त्यांना लखलाभ होवो, अशी प्रतिक्रिया सत्तासमिकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे.
अधिक वाचा : भाजप-सेनेची 'कल्याण'मध्ये शिजली 'डाळ', मनसे 'उपाशी'
कल्याण डोंबिवलीत सत्तास्थापनेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ सुरु असताना मनसेनेने खेळी खेळली. आपल्या एक समर्थकासह १० नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन केला. कल्याण डोंबिवलीत सत्तास्थापनेसाठी शिवसेना आणि भाजप या दोन्ही गटांकडून संख्याबळासाठी गळ टाकले जात आहेत. नगरसेवकांची फोडाफोडी टाळण्यासाठी मनसेनं १० जणांचा गट करून कोकण आयुक्तांना पत्र दिले. त्यामुळे मनसे विरोधी बाकावर बसण्याची खेळी होती. ती योग्यच ठरली.
अधिक वाचा : कल्याण-डोंबिवलीत शिवसेना-भाजपची सत्ता, युतीबाबत एकमत
केडीएमसीमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये सत्ता स्थापनेसाठी चढाओढ सुरु होती. आज मुंबईत दोन्ही पक्षांची बैठक झाली. या बैठकीत युती करण्यावर सकारात्मक चर्चा झाली. दोन दिवसात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.