मुंबई : आमच्यापुढे अनेक पर्याय आहे, असे भाजपने स्पष्ट केले. त्याचवेळी आमचा मार्ग आम्ही शोधू अशी भूमिका घेणाऱ्या शिवसेने होय नाय होय म्हणत युतीवर शिक्कामोर्तब करण्याचे ठरवले. त्यामुळे केडीएमसीमध्ये शिवसेना-भाजपची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र, शिवसेना महापौर पदावर ठाम आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी घेतली शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची बैठकीनंतर तात्काळ भेट घेतली.
मुंबईत शिवसेना-भाजप नेत्यांच्या बैठकीत युतीबाबत निर्णय झाला. शिवसेना नेते सुभाष देसाई आणि भाजप प्रदेश अध्यक्ष रावराहेब दानवे यांच्यात ही बैठक झाली. युती करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीनंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यात बैठक होऊन युतीवर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळे चर्चेनंतर आता नवा काय फॉम्युर्ला तयार होतो, याकडे लक्ष लागलेय.
दरम्यान, भाजपनेही दबावतंत्राचा वापर करत राजकीय खेळी केली. आमच्याकडेही पर्याय खुले असल्याचे सांगत महापौर आमचाच बसेल असे रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे शिवसेनेने आमचा मार्ग आम्ही शोधू असे म्हटले होते. मात्र, पुन्हा गाठी-भेटी होऊन युतीचे सूत जुळविण्यात आलेय. त्यामुळे भाजप महापौरपदासाठी कायम राहणार का, याची उत्सुकता आहे. त्यातच शिवसेना या पदासाठी ठाम असल्याने तणाव तसा कायम असल्याची चर्चा आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.