उद्धव ठाकरे यांनी संपत्ती वेबसाइटवर जाहीर करावी - किरीट सोमय्या

 पारदर्शकतेच्या मुद्यावरून शिवसेना-भाजपचा सुरू झालेला संघर्ष आता टोकाला पोहचलाय. पारदर्शकतेच्या मुद्द्यावर भाजप खासदार किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा लक्ष्य केलंय. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 13, 2017, 06:36 PM IST
 उद्धव ठाकरे यांनी संपत्ती वेबसाइटवर जाहीर करावी - किरीट सोमय्या  title=

मुंबई :  पारदर्शकतेच्या मुद्यावरून शिवसेना-भाजपचा सुरू झालेला संघर्ष आता टोकाला पोहचलाय. पारदर्शकतेच्या मुद्द्यावर भाजप खासदार किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा लक्ष्य केलंय. 

 
 आपली संपत्ती सर्व संपत्ती आपण वेबसाईटवर जाहीर केली आहे. त्यामुळं आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही त्यांची सर्व संपत्ती वेबसाईटवर जाहीर करण्याचं खुलं आव्हान सोमय्यांनी दिलंय. एवढंच नव्हे तर शिवसेनेतल्या काही बड्या नेत्यांनी अफरातफर केल्याचा खळबळजनक आरोपही सोमय्यांनी केलाय. 
 
 यातल्या सात कंपन्यांची नावंही सोमय्यांनी घोषित केली असून यापैकी दोन कंपन्यांमध्ये भुजबळांची गुंतवणूक असल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय. 
सोमय्यांच्या आरोपांमुळं भाजप-शिवसेनेतील संघर्ष आणखीनच पेटणार असल्याचं दिसतंय.