मुंबई : दक्षिण मुंबईला जोडणारा लालबाग उड्डाणपूल सकाळी सुमारे 3 तास वाहतुकीकरता बंद ठेवण्यात आला होता.
सुमारे अडीच किलोमीटर लांबीच्या उड्डाणपूलाच्या मधोमध, पुलाच्या सांध्यामधली भेग रुंदावली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेनं अभियंतांना तातडीनं उड्डाणपूलाच्या तपासणीसाठी बोलावून घेतलं.
दरम्यान लालबाग उड्डाणपूल दोन्ही दिशांच्या वाहतुकीसाठी सकाळपासून बंद ठेवण्यात आला होता. अखेर तपासणीनंतर साडे नऊच्या सुमाराला हा उड्डाणपूल वाहतुकीकरता खुला करण्यात आला.
मात्र सध्या या उड्डाणपूलावरून सर्व प्रकारच्या जड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. याआधीही लालबाग उड्डाणपुलावर भेग आढळल्यानं, हा उड्डाणपूल चर्चेत राहिला होता.