लालबाग मंडळाचा माज कायम, पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की

लालबाग मंडळाचा माज सुरुच असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्याला  धक्काबुक्की करत शिवीगाळ केली.  

Updated: Sep 6, 2016, 02:44 PM IST
लालबाग मंडळाचा माज कायम, पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की  title=
संग्रहित छाया

मुंबई : लालबाग मंडळाचा माज सुरुच असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्याला  धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. याआधी महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. याबाबत तीव्र संताप व्यक्त होत होता.

पहिल्याच दिवशी लालबाग मंडळांने धक्काबुक्की करण्याची आपली परंपरा कायम ठेवली आहे. सोसायटी गेटने सुरक्षेच्या कारणास्तव आत जाताना पोलिसांना मज्जाव करण्यात आला. तसेच पोलीस ड्युटीवर असताना त्यांना आत जाण्यास मनाई करण्यात आली. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की केली. 

एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या मुलाने पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस अधिकाऱ्याला रहाटे नावाच्या मुलाने मज्जाव केला. मुंबई पोलिसांनी ३५३ आणि ३३२ प्रमाणे त्याचावर गुन्हा दाखल केला आहे.

याआधीचा हा जुना व्हिडिओ पाहा :