www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईत आज संध्याकाळी महालक्ष्मी रेसकोर्सवर `ए मेरे वतन के लोगो ` हा भव्यदिव्य कार्यक्रम होतोयं. सुमारे एक लाखापेक्षा जास्त नागरीक `ए मेरे वतन के लोगो ` हे गीत गाणार आहेत.
गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर कार्यक्रमाला उपस्थित असल्या तरी त्या गाणार नसल्याचं समजतंय, यावेळी नरेंद्र मोदी यांचीही उपस्थितीत असणार आहे.
लतादीदींनी 27 जानेवारी 1963 ला हे गीत गायले होते. या गीताला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
गान कोकिळा लता मंगेशकर यांनी गायलेलं आणि कवी प्रदीप यांनी लिहिलेलं `ऐ मेरे वतन के लोगों` या गीताला ५० वर्ष पूर्ण होत आहेत.
या गीताची सूवर्ण जयंती साजरी करण्याची जोरदार तयारी सुरू आहे. मुंबईत आज या गीताचा सुवर्ण जयंती समारोह साजरा केला जाणार आहे.
आयोजकांच्या माहितीनुसार १ लाख गायक लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत एक साथ गाणार आहेत. यावेळी लता मंगेशकरही उपस्थित राहणार आहेत.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदीही यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी चर्चा आहे.
आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार १ लाख गायकांसोबत लता मंगेशकरही हे गीत गातील अशी शक्यता होती. पण लता मंगेशकर या `ऐ मेरे वतन के लोगों` गीत गाणार नसल्याचं वृत्त आहे.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत २७ जानेवारी १९६३ रोजी पहिल्यांदा लता मंगेशकर यांनी `ऐ मेरे वतन के लोगों` हे गीत गायलं होतं.
लता मंगेशकर यांनी हे गीत, १९६२ साली भारत-चीन युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली म्हणून गायिल होतं.
या कार्यक्रमाला लष्करी पदक सन्मानित 50 अधिकारी उपस्थित रहाणार आहे. तसंच 10 हजार माजी सैनिक तसंच शहीद सैनिकांचे नातेवाईक उपस्थित रहाणार आहेत.
विशेष म्हणजे मरणोत्तर परमवीरचक्र सन्मानित अब्दूल हमीद यांच्या परिवारातील 8 सदस्य उपस्थित रहाणार आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.