घारापुरी : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणारं घारापुरी बेट आजही अंधारात आहे. इथं अजूनही वीज पोचलेली नाही. मात्र लवकरच हे बेट प्रकाशमान होणार आहे.
घारापुरी... मुंबईपासून अगदी जवळ असलेलं जागतिक वारसा लाभलेलं पर्यटनस्थळ. दरवर्षी देशविदेशातले लाखो पर्यटक इथं भेट देत असतात. मात्र स्वातंत्र्याच्या पासष्टीनंतरही हे पर्यटनस्थळ अंधारात आहे. आता हा अंधार दूर करण्यासाठी महावितरणनं २८ कोटींची महत्वाकांक्षी योजना तयार केलीय.
यापूर्वीदेखील घारापुरी बेटावर वीज उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न झाले होते. मात्र त्यांना यश आलं नाही. त्यामुळं यावेळी वेगळी शक्कल वापरली जाणाराय. सहा महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यामुळं लवकरच जागतिक दर्जाचं हे पर्यटनस्थळ वेगळ्या अर्थानं प्रकाशात येईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.