मुंबई : २२ कोटी रुपयांच्या एम डी ड्रग्ज प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचला न्यायालयाने जोरदार झटका दिलाय. १२२ किलो एम डी ड्रग्ज प्रकरण मुंबई क्राईमब्राचंच्या हातून जवळपास निसटले आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी धर्मराज काळोखेला मुंबई सत्र न्यायालयाने ५ लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन दिलाय.
याआधी या प्रकणातील महिला मुख्य आरोपी बेबी पाटणकर हिला मुंबई सत्र न्यायालयाने १५ जुलै रोजी ५ लाख रुपयांच्या व्यक्तीगत जात मुचलक्यावर जामिन दिला होता. या प्रकरणातील हा १२ वा जामीन आहे. याधी अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी बेबी आणि धर्मराज काळोखेला मदत केल्याच्या आरोपाखाली अटक असलेल्या सर्व पोलीसांना न्यायालायने जामीन दिला होता.
त्यानंतर अंमली पदार्थांची तस्करी केली या आरोपाखाली अटक असलेला बेबीचा मुलगा, सतिश पाटणकर, तस्कर सॅम्युल आणि इतर तिघांना न्यायालयाने १ लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन दिली होता. आणि आता धर्मराज काळोखेला ५ लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन दिलाय.
अचानक या प्रकणात १२२ किलो अंमली पदार्थ हे अजिनो मोटो असल्याचे एफएसएल रिपोर्टमध्ये आले आणि या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली. या प्रकरणात मुंबई क्राईम ब्राचंच्या मोठ्या अधिकारी आणि अनेक पोलीसांची नावे असल्याने हे प्रकरण संपवले आहे असं बोललं जातय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.